पीएमपीच्या निगडी आगाराचा संप मिटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमपीच्या निगडी आगाराचा संप मिटला
पीएमपीच्या निगडी आगाराचा संप मिटला

पीएमपीच्या निगडी आगाराचा संप मिटला

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) निगडीतील आगाराच्या चालकांनी ऐन दिवाळीत बोनसच्या मागणीसाठी काही तास (ता.२१) शुक्रवारी संप पुकारला होता. परंतु, बोनस पगारात जमा झाल्याने तसेच दिवाळीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये कर्मचाऱ्यांना मिळाल्यामुळे एका तासात पीएमपीची चाके रस्त्यावर धावू लागली.
पीएमपीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा ठेका ‘हंसा’ या खासगी कंपनीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. कंपनीवर आर्थिक अधिभार पडू नये याकरिता दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात ८.३३ टक्के इतका बोनस जमा केला जात आहे. परंतु, काही चालक आणि वाहकांना त्याची माहिती नाही. तसेच काहींना दिवाळी खर्चासाठी अतिरिक्त पैसे हवे होते. त्यामुळे, २१ तारखेला पहाटे चार वाजता आगारात चालकांनी गाड्या उभ्या केल्याचे कंपनीचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्यामुळे, प्रशासनासह ठेकेदार कंपनीची धावपळ उडाली. त्यानंतर, खासगी ठेका असलेल्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून पाच हजार रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर पहिल्या पाळीतील बस धावल्या.

‘‘ठेकेदाराकडे असलेल्या ७२ पैकी २५ गाड्या मार्गावर त्यादिवशी सोडल्या होत्या. इतर गाड्या एका तासाने सोडण्यात आल्या. प्रवाशांची गैरसोय झालेली नाही. इतर डेपोमधील बसेस देखील मागविण्यात आल्या होत्या.’’
- डी.एम. वाघेरे, आगार व्यवस्थापक, निगडी आगार