पैठणीच्या खेळातून ‘स्वच्छतेचा जागर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैठणीच्या खेळातून ‘स्वच्छतेचा जागर’
पैठणीच्या खेळातून ‘स्वच्छतेचा जागर’

पैठणीच्या खेळातून ‘स्वच्छतेचा जागर’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः महापालिकेतर्फे आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात दीपावलीचे औचित्य साधून ‘स्वच्छता का उपहार’ कार्यक्रमाअंतर्गत ‘खेळ पैठणीचा’ सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्याद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात झालेल्‍या कार्यक्रमाला सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक भीमराव कांबळे आदी उपस्थित होते. सहशिक्षिका अनुजा कांबळे विजेत्या ठरल्या. त्यांनी मानाची पैठणी पटकावली. आकुर्डी येथील पंचतारानगरमध्ये आकुर्डी हॉस्पिटल जवळ, निगडीतील भक्ती-शक्ती उद्यान, थेरगाव येथील बापुजीबुवा उद्यान, चिंचवड येथील राजमाता जिजाऊ उद्यान, भोसरी येथील इंद्रायणीनगर बॅडमिंटन हॉल, मोशी येथील नागेश्वर मंदिरासमोर आणि दापोडी येथील विहारात कार्यक्रम झाला. या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छता, कचरा विलगीकरण, प्लास्टिकबंदी आणि प्रदूषण आदींबाबत जनजागृती करण्यात आली.
---