चिंचवडमध्ये उद्या पहाटे ‘सकाळ संगे, स्वरस्पंदनाचे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडमध्ये उद्या पहाटे ‘सकाळ संगे, स्वरस्पंदनाचे’
चिंचवडमध्ये उद्या पहाटे ‘सकाळ संगे, स्वरस्पंदनाचे’

चिंचवडमध्ये उद्या पहाटे ‘सकाळ संगे, स्वरस्पंदनाचे’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील रसिकांसाठी ‘सकाळ’ने संगीतमय मेजवानी ठेवली आहे. ‘सकाळ संगे, स्वरस्पंदनाचे’ हा दिवाळी पहाट कार्यक्रम मंगळवारी (ता.२५) पहाटे साडेपाच वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केला आहे. शब्दसूरांच्या या सुरेख मैफलीत गायन आणि नृत्याचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
‘सकाळ’च्या माध्यमातून पहाटेच्या प्रसन्नवेळी सूर-तालांनी पिंपरी-चिंचवडच्या रसिकजनांची दिवाळी पहाट आणखी प्रसन्न होणार आहे. स्वरांश एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘सकाळ संगे स्वरस्पंदनाचे’ या कार्यक्रमात पार्श्वगायिका स्वप्नजा लेले, सई टेंभेकर, सारेगम फेम गायक अक्षय घाणेकर व अमेय जोग विविध गाणी सादर करतील. तसेच प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या समवेत जुई सगदेव व सिमरन पवार यांचे नृत्य होईल. दीप्ती कुलकर्णी (हार्मोनियम), समीर बंकापुरे (तबला), नितीन खंडागळे (की-बोर्डे), अभिषेक काटे (ऱ्हीदम) व शैलेश लेले (ढोलक व डीजे) हे साथसंगीत करतील. रवींद्र खरे यांचे निवेदन असेल. शशी बडे यांची ध्वनी व्यवस्था आहे. सर्वांना मोफत प्रवेश आहे.

काय? कुठे? कधी? केंव्हा
काय? ः स्वरांश एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘सकाळ संगे स्वरस्पंदनाचे’
कुठे? ः प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
कधी? ः मंगळवार, तारीख २५ ऑक्टोबर
केव्हा? ः पहाटे ५.३० वाजता

विशेष सूचना ः प्रवेश विनामूल्य
अधिक माहितीसाठी संपर्क ः आदित्य - ९९२२२४७५५६, रोशन - ९५४५९८११५९