सुमधूर सप्तसुराने रसिक चिंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमधूर सप्तसुराने रसिक चिंब
सुमधूर सप्तसुराने रसिक चिंब

सुमधूर सप्तसुराने रसिक चिंब

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः ‘तू सप्तसूर माझे’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘सूर तेचि’, ‘पुकारता चला हू मै’, ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘अश्विनी ये ना’ अशा विविध गीतांनी सोहम योग साधना आणि फोरम फॉर म्युझिक फाउंडेशनची ‘स्वरबहार’ ही दिवाळी पहाट मैफल रंगली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात वरील मैफल आयोजित करण्यात होती. माजी नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, उद्योजक रवी नामदे, आशुतोष कुलकर्णी, वासुदेव केळकर, केरिंग हॅंन्डसचे विश्वस्त सुधीर नाईक आणि अंबादास चव्हाण उपस्थित होते. गायक आशुतोष सुरजुसे आणि गायिका ऋतुजा केंच यांच्यासोबत सिटी प्राईड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘हीच अमुची प्रार्थना’ हे गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली. त्यानंतर लावणी, कोळीगीते, भावगीते कलाकारांनी सादर केली. प्रख्यात गायिका लता मंगेशकर व ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांना स्वरांजली वाहिली. त्यांची मेंदीच्या पानावर, गोरी है कलैय्या, ओ पालन हारे अशी गाणी अक्षय घाणेकर, ईशानी कुलकर्णी, मृदुला कुलकर्णी, आशुतोष सुरजूसे, ऋतुजा केंच, श्रीनिवास कुलकर्णी, अनिल झोपे, मंगेश उमराणी, उदय टाकळकर यांनी गाणी सादर केली. संतोष मुरूडकर, राहुल राठोड, सोनल शिंदे, श्रावणी कंदलगावकर यांनी सहगायन केले. वैभव भोसले (ढोलकी), वैभव केसकर, रोहन चिंचोरे (तबला), ऋतुराज कोरे (ऑक्टोपॅड), निषाद शिधये (साईड ऱ्हिदम), राजेश झिरपे, वेदांत देवळे (सिंथेसाईजर), लिजेश शशिधरन (बेस गिटार) यांनी साथसंगत केली. मंदार ढुमणे यांनी संगीत संयोजन केले. स्वाती देशपांडे, मिलिंद बावा यांनी निवेदन केले. दिगंबर उचगावकर, अनुजा उचगावकर यांनी संयोजन केले. रश्मी उचगावकर यांनी आभार मानले.