विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ : तरुणीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
संजय माउली माळवदकर (वय २३, रा.समता कॉलनी, वराळे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या फोटो स्टुडिओमध्ये त्यांच्या सहकाऱ्यासोबत फोटो एडिटिंगचे काम करत होत्या. दरम्यान, आरोपी फोटो एडिटिंगचे रूममध्ये आला. फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच फिर्यादी यांचे त्यांच्या सहकाऱ्यासोबत संबंध असल्याचा संशय घेऊन त्यास शिवीगाळ केली. दरम्यान, फिर्यादीचे वडील तेथे आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांना ‘‘जर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत केले नाही. तर मी तुमच्या मुलीचा जीव घेईन, मी तिला दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही.’’ अशी धमकी दिली. आरोपी हा नेहमी फिर्यादी यांचा कॉलेजला पाठलाग करायचा. पोलिस अधिक तपास करत आहेत.