स्वरामृतात न्हाले रसिकश्रोते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वरामृतात न्हाले रसिकश्रोते
स्वरामृतात न्हाले रसिकश्रोते

स्वरामृतात न्हाले रसिकश्रोते

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः ‘आम्ही विठ्ठलाचे वारकरी, दिन गेले भजनाविना सारे...’ या गजरात पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले. निमित्त होते, उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित ‘स्वरामृत दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे.
दीपोत्सवासोबत रंगलेल्या स्वरसूरांनी रसिक भारावून गेले. एका पेक्षा एक सरस अशी भक्ती आणि भावगीत सादर करून गायक प्रथमेश लघाटे, कल्याण गायकवाड, गायिका कार्तिकी गायकवाड, अनुराधा पटवर्धन यांनी रसिकांची प्रत्येक गाण्याला मने जिंकली. तब्बल सात मिनिटे विठ्ठलाचा गजर केला. गोविंद यशदा चौकातील लिनिअर गार्डनमध्ये कार्यक्रम झाला. उन्नती सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्ष चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा भिसे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, उद्योजक संजय भिसे, पुरुषोत्तम महाराज पायगुडे, शेखर महाराज जांभूळकर, अनुक्षा गाडेकर, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे, पीके इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, उद्योजक वसंत काटे, जयनाथ काटे, विजय भिसे, भानुदास काटे, सुरेश कुंजीर, विलास काटे, विकास काटे, शशी काटे, अतुल पाटील, शाम कुंजीर, राजेंद्र जयस्वाल आदी उपस्थित होते.
‘कैसे रिजावू अब मन को’, ‘जगदंबिका अंबिका’, ‘जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर’, ‘ठाई ठाई विठ्ठल’, ‘सूरत पिया बिन छिन बिसराये’, ‘मन हे राम रंगी रंगले’, ‘झिनी रे झिनी चदरिया’, ‘हे सूरांनो चंद्र व्हा!’, ‘कानडा राजा पंढरीचा’ आदी रचना सादर केल्या. संगीत संयोजक गणेश गायकवाड यांचे होते. अपूर्व गोखले (व्हायोलीन), प्रवीण कासलीकर (हार्मोनियम), किशोर कोरडे (तबला), राजेंद्र बघे (पखवाज), नीलेश बुंदे (बासरी), दयानंद घोटकर व पूजा थिगळे (निवेदन) यांनी साथसंगत केली.