करंडक किक्रेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करंडक किक्रेट स्पर्धा
करंडक किक्रेट स्पर्धा

करंडक किक्रेट स्पर्धा

sakal_logo
By

यंगस्टार करंडक स्पर्धेत
सिल्‍व्हर ॲकॅडमी विजयी

पिंपरी, ता. २४ ः यंगस्टार क्रिकेट क्लबने १९ वर्षाखालील टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा घेतल्या. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिल्‍व्हर क्रिकेट ॲकॅडमीने यशस्वी क्रिकेट क्लबचा ६६ धावांनी पराभव केला.
चिखलीतील सिल्‍व्हर क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर पाच संघांमध्ये ही स्पर्धा झाली. सिल्‍व्हर क्रिकेट ॲकॅडमीने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना संघाने २० षटकात सात बाद १५९ धावा केल्या. हर्षल हाडके याने ४५ चेंडूत ७२ धावा, उत्कर्ष चौधरी ३९ चेंडूत ४५ धावा केल्या तर यशस्वी संघाने २० षटकांत ७ बाद ९३ धावा केल्या. उत्कृष्ट फलंदाज हर्षल हाडके तर उत्कृष्ट गोलदांज महेश्‍वर वाघ ठरला. अष्टपैलू खेळाडू हर्षल हाडके ठरला.
बक्षीस वितरण समारंभात माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली. यावेळी अशोक बंग, क्रिकेटप्रशिक्षक राजू कोतवाल आणि संयोजक आनंद गुप्ता उपस्थित होते.

धावफलक ः सिल्‍व्हर क्रिकेट ॲकॅडमी - २० षटकात सात बाद १५९ धावा. हर्षल हाडके ७२, उत्कर्ष चौधरी ४५, समर्थ गोटे १९, वैभव लवंडे २.-२०, महेश्‍वर वाघ २-३८. यशस्वी क्लब - २० षटकात सात बाद ९३ धावा. भावेश बन्सल १९, तरुण धरमानी ११, ओम रहाटल ११स प्रज्वल पवार ३-१२, ओम सुर्वे २-१८, ओम वडरायकर १-१५ .