ऋतुरंग सोशल फाउंडेशनकडून दिवाळी फराळ पाकिट वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतुरंग सोशल फाउंडेशनकडून 
दिवाळी फराळ पाकिट वाटप
ऋतुरंग सोशल फाउंडेशनकडून दिवाळी फराळ पाकिट वाटप

ऋतुरंग सोशल फाउंडेशनकडून दिवाळी फराळ पाकिट वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः पिंपळे सौदागर येथील ऋतुरंग सोशल फाउंडेशनच्यावतीने कातकरी वस्ती, चाकण याठिकाणी सुमारे ७० कुटुंबांना दिवाळी सणानिमित्त किराणा व दिवाळी फराळ पाकिट वाटप करण्यात आले. दिवाळी किराणा व फराळ मिळालेल्या बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली.

समाजातील सर्व घटक आनंदाने दिवाळी साजरी करत असताना, आपलाच गरीब समाज बांधव दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये म्हणून ऋतुरंग सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष वैशाली आघाव यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने निधी गोळा करून, दिवाळी किराणा व फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मिसेस आशिया इंटरनॅशनल दुबई पिंकी तिलोकचांदानी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य नितीन गुलाबराव गोरे, सनी हेवी इंडस्ट्रीचे जनरल मॅनेजर केशव आघाव, उद्योजक नितीन अग्रवाल उपस्थित होते.