चिंचवडला दिवाळी पहाट उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिंचवडला दिवाळी पहाट उत्साहात
चिंचवडला दिवाळी पहाट उत्साहात

चिंचवडला दिवाळी पहाट उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्यावतीने, चिंचवड येथे दिवाळीच्या मंगलमय पहाटे मन तृप्त करणारी भावगीते, भक्तीगीते आणि हिंदी मराठी चित्रपट गीतांचा सुरेल ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मधुमति निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत ‘रजनीगंधा पेशकश’ या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध पार्श्वगायक जितेंद्र अभ्यंकर, सुजाता जोशी-गोडबोले, स्वप्नजा लेले, मधुसूदन ओझा आणि कलावंत यांनी हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सचिन वाघमारे यांनी बासरीवादन करून यमन राग सादर केला. भूपाळी गाऊन जितेंद्र अभ्यंकर आणि सुजाता जोशी-गोडबोले यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर मधुसूदन ओझा, स्वप्नजा लेले, मानसी घुले-भोईर आणि सार्थक भोसले यांनी वेगवेगळी गाणी गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या कार्यक्रमात जितेंद्र अभ्यंकर यांनी ‘किसी की मुस्कुराहटो पे’ गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास परिसरातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे निवेदन मधुसूदन ओझा यांनी केले. यावेळी माजी नगरेसवक भाऊसाहेब भोईर, हर्षवर्धन भोईर, किरण भोईर, मानसी गौरव घुले-भोईर आदी उपस्थित होते.