औद्योगिक समस्यांवर चाकणमध्ये बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक समस्यांवर 
चाकणमध्ये बैठक
औद्योगिक समस्यांवर चाकणमध्ये बैठक

औद्योगिक समस्यांवर चाकणमध्ये बैठक

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : चाकणमधील औद्योगिक समस्यांवर उद्योगमंत्री यांच्यासोबत १९ ऑक्टोबरला बैठक झाली. बैठकीस आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष गोविंद पानसरे, मोतीलाल साकला, दिलीप बटवाल व इतर पदाधिकारी तसेच एमआयडीसी विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फारुक मुकादम, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे उपस्थित होते.
पानसरे यांनी सुचविले की, राज्य सरकारमध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा, उद्योगांना चालना द्यावी, एमआयडीसी, पीएमआरडीए, महानगरपालिका, उद्योग विभाग, पर्यावरण, महावितरण, ग्रामपंचायत आदी शासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. अनेक विकासकामांसह ईटीपी मार्गी लावण्याची कामे रखडली आहेत. माथाडी कामगार, चोऱ्या, महिला असुरक्षितता यावर पोलिस आयुक्तांनी कडक कारवाईचे आदेश द्यावेत. रेड झोन समस्या, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मूलभूत पायाभूत सुविधा, निर्यातीला चालना देण्यासाठी कार्गो विमानतळ अद्ययावत करण्यात यावेत. केंद्र व राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी. इएसआयसी राज्य कामगार विमा योजना, हॉस्पिटल सेवा अत्यावश्यक यंत्रणा, मशिनरी मनुष्यबळात सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.