भाऊबीजेसाठी एसटीच्या जादा फेऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाऊबीजेसाठी एसटीच्या जादा फेऱ्या
भाऊबीजेसाठी एसटीच्या जादा फेऱ्या

भाऊबीजेसाठी एसटीच्या जादा फेऱ्या

sakal_logo
By

पिंपरी, ता.२५ : दिवाळी सुट्यांमुळे गावी जाण्यासाठी एसटी चाकरमान्यांनी ‘फुल्ल’ झाल्याचे चित्र बस स्थानकावर पहायला मिळत आहे. दिवाळीनंतर भाऊबीजेला माहेरी जाण्यासाठी सासुरवाशिणींना प्रवास करण्यासाठी ‘एसटी’ने दोन जादा बस सोडल्या आहेत. याशिवाय, संभाव्य गर्दी लक्षात घेता एसटीच्या जादा फेऱ्या सुरु झाल्या आहेत. यामुळे, सकाळपासून वल्लभनगर आगारात मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी मंगळवारी होती.
गेल्या वर्षी ऐन गर्दीच्‍या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्‍यामुळे महामंडळाला मिळणारी ‘भाऊबीज’ मिळू शकली नव्हती. यावर्षी भाऊबीजेसाठी वल्लभनगर आगाराने नियोजन केले आहे. शेगाव आणि लातूर या ठिकाणी जाण्यासाठी दोन जादा बस सोडल्या जाणार आहेत. तसेच जिल्हा अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रवाशांच्या संख्येतील वाढ लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने अगोदरच तयारी केली आहे. भाऊबीजेनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता २३ ऑक्टोबरपासून एसटी आगारातून जादा फेऱ्या सुरु झाल्या आहेत. प्रत्येक प्रमुख बसथांब्यावर आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे मोबाईल अॅप, एसटीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रवाशांना तिकीट आरक्षण करण्याच्या सुविधेचाही लाभ घेता येणार आहे.

भाडेवाढ करूनही प्रतिसाद चांगला
ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी बसच्या तिकीट दरात २० ऑक्टोबरपासून भाडेवाढ करण्यात आली आहे. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दहा टक्के वाढीव दराने भाडे आकारणी सुरू झाली आहे. तरीही दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी शहरातून आपापल्या गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


पासधारकांना दरवाढ लागू नसेल
सणउत्सवात दरवर्षी एसटीतर्फे भाडेवाढ केली जाते. यंदा १० टक्के वाढ करण्यात आली आहे. परिवर्तन, निमआराम, हिरकणी, शिवशाही, स्लिपर कोच या बसेसला ही दरवाढ लागू असेल. शिवनेरीला आणि पासधारकांनाही दरवाढ लागू केलेली नाही.

फोटो १३२२