दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिरांचे परिसर तेजोमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिरांचे परिसर तेजोमय
दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिरांचे परिसर तेजोमय

दिवाळी पाडव्यानिमित्त हजारो दिव्यांनी मंदिरांचे परिसर तेजोमय

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः आमदार लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप मित्र परिवार, तसेच भाजपचे सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने बुधवारी पिंपळे गुरव आणि नवी सांगवी परिसरातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.

पिंपळे गुरव येथील भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सूर्यमुखी गणेश मंदिर, कान्होबा मंदिर, नवी सांगवी येथील महालक्ष्मी मंदिर, गजानन नगर येथील गजानन महाराज मंदिर, काटेपुरम चौक येथील खाडेबाबा मठ याठिकाणी दीपोत्सव साजरा केला. सुंदर रांगोळीमुळे आलेली प्रसन्नता आणि दीपोत्सवाचा मंद उजेड यामुळे सर्व मंदिरे उजळून गेली. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, माजी नगरसेविका माधवी राजापुरे, ज्येष्ठ नागरिक दामोदर काशीद, जयवंत देवकर आणि चावडी ग्रुपचे सदस्य, भाविक उपस्थित होते.
--
उजळला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने थेरगावातील डांगे चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पुतळा येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी पुतळा परिसर उजळून निघाला. बुधवारी (ता. २६) सायंकाळी झालेल्या या दीपोत्सवाला खासदार श्रीरंग बारणे, सरिता बारणे, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, धनाजी बारणे, उद्योजक महेश बारणे, सरिता साने, माजी नगरसेविका विमल जगताप, राजेंद्र तरस, निखिल येवले, बशीर सुतार, अंकुश कोळेकर, माऊली जगताप आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.