संत तुकाराम कारखान्यावर लगबग सुरु ; ऊस तोडणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत तुकाराम कारखान्यावर लगबग सुरु ;  ऊस तोडणीला वेग
संत तुकाराम कारखान्यावर लगबग सुरु ; ऊस तोडणीला वेग

संत तुकाराम कारखान्यावर लगबग सुरु ; ऊस तोडणीला वेग

sakal_logo
By

सोमाटणे, ता.२८ ः परतीचा पाऊस थांबल्याने संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस तोडणीच्या कामाला वेग आला आहे.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा २५ वा गाळप हंगाम देखील गतीने सुरु झाला आहे. कारखाना सुरु होताच कामगारांची ऊस तोडणी व वाहतुकीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाने मावळात धुमाकूळ घतला होता. त्यामुळे, शेतकऱ्यांची सर्वच कामे ठप्प झाली होती. तर उसाची मुदत भरून ऊस तोडणीला आला होता. मात्र, पावसामुळे तोडणी लांबण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत होती. तर शेतात पाणी साठल्याने उसाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली होती. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. पाऊस उघडताच नियमित वेळेनुसार संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या गाळप हंगामानेही गती धरली आहे. यावर्षी, कारखाना कार्यक्षेत्रात मावळ, मुळशी, हवेली, खेडमध्ये उसाचे क्षेत्र वाढले असून कार्यक्षेत्रात एकूण सात हजार चारशे हेक्टर क्षेत्रात ऊस लावणी झाली होती. त्यामुळे, यावर्षी सहा ते सात लाख टन ऊस गाळपास उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पाच लाख ८८ हाजार ३६२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यावर्षी एक लाख मेट्रिक टन ऊस गाळप वाढण्याची शक्यता कारखान्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली. उसाचे क्षेत्र वाढले तरही गाळप पूर्ण करण्याचे नियोजन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्याक्ष बापूसाहेब भेगडे व सर्व संचालकांनी केले आहे.