‘कष्टकरी कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कष्टकरी कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत’
‘कष्टकरी कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत’

‘कष्टकरी कामगारांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत’

sakal_logo
By

पिंपरी, ता.२८ ः कष्टकरी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावेत, ही मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मुंबई येथे भेटीत केली. पाटील यांच्यासमवेत कामगारांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. अन्यायकारक नवीन कामगार कायदे, तसेच बांधकाम कामगार, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, वाहन चालक-मालक यांच्यासाठी विविध योजनांसह त्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच मुंबईत राज्यव्यापी बैठक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, फरीद शेख, इरफान चौधरी, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.