शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षक भरतीसाठी हालचाली? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षक भरतीसाठी हालचाली?
शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षक भरतीसाठी हालचाली?

शिक्षण विभागाकडून नवीन शिक्षक भरतीसाठी हालचाली?

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षण विभागाकडून नवीन २८५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सहायक आणि शिक्षक या दोन पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून येत्या काही दिवसांतच याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

शहरात महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळा आहेत. त्यातील २१ शाळा सध्या मुख्याध्यापकाविना सुरू आहेत. तर, शिक्षकांचीही कमतरता आहे. मुख्याध्यापकांच्या २१ जागांवर पात्रता धारण करणाऱ्या शिक्षकांना लवकरच पदोन्नती देण्यात येणार आहे. मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या दोन्ही पदांवर शैक्षणिक अर्हता व सेवा कालमर्यादिनुसार पात्र शिक्षकांना पदोन्नती दिल्यानंतर शिक्षकांची संख्या आणखी कमी होणार आहे. तर, काही सेवानिवृत्त होणार आहेत. त्यातच रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी प्राथमिक विभागाकडून कंत्राट पद्धतीने भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकूण २८५ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यातील काही पदे सहायक आणि काही पदवीधर म्हणून भरली जाणार आहेत. त्यामुळे स्वतंत्र शिक्षक उपलब्ध होणार आहे.

ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून येत्या काही दिवसांतच याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सहायक पदासाठी डीएड ही अर्हता असणार आहे. तर, पदवीधर पदासाठी बीएड ही पदोन्नती दिली जाणार शैक्षणिक अर्हता निर्धारित राहणार आहे. मेरिट तपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मेरिटमधल्या उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. या शिक्षकांचा कंत्राट कालावधी सहा महिन्याचा राहणार आहे. त्यांना प्रतिमहा २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.

कोट
‘‘सध्या सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याचे काम हाती आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पात्र शिक्षकांना पदोन्नती दिली जाणार आहे. या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. लवकरच पात्र शिक्षकांना मुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार आहे. तसेच, निवृत्त शिक्षकांच्या जागा विचारात घेऊन एकूण शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.’’
- संदीप खोत, उपायुक्त, प्राथमिक शिक्षण विभाग