ऐन दिवाळीतही विजेची मागणी कमी मोठमोठ्या विविध कंपन्या बंद असल्याचा परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन दिवाळीतही विजेची मागणी कमी
मोठमोठ्या विविध कंपन्या बंद असल्याचा परिणाम
ऐन दिवाळीतही विजेची मागणी कमी मोठमोठ्या विविध कंपन्या बंद असल्याचा परिणाम

ऐन दिवाळीतही विजेची मागणी कमी मोठमोठ्या विविध कंपन्या बंद असल्याचा परिणाम

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः दिवाळीत उद्योग - कारखानदारी बंद असल्याने विजेचा औद्योगिक वापर कमी झाला आहे. यामुळे दिवाळीच्या प्रकाशपर्व काळातही शहरात विजेची मागणी वाढली नाही. या उलट सोमवारी (ता.२४) व मंगळवारी (ता. २५) सरासरीपेक्षा २५ टक्क्ंयानी कमी वापर झाला. दिवाळीत विजेची मागणी वाढलीच नसल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले.
पावसाळ्यातील जुलै-ऑगस्टमध्ये शहरात विजेची मागणी २० टक्के घसरते. तर, दरवर्षीप्रमाणेऑक्टोबर हीटमध्ये सरासरी विजेची मागणी ३ हजार मेगावॉटने वाढेल, असा अंदाज होता. मात्र यंदा परतीचा पावसामुळे मागणी वाढली नाही. याउलट दिवाळीच्या काळात शहरात विजेची मागणी सरासरी दोन ते अडीच हजार मेगावॉटने कमी होती. एमआयडीसीतील कंपन्या, आयटी कंपन्या, कारखानदारी, छोटे व मोठे उद्योग दिवाळीत बंद असल्याने औद्योगिक क्षेत्रातून वापर कमी झाल्यामुळे मागणी कमी झाली. दीपोत्सवामुळे केवळ घरगुती विजेची मागणी आहे. त्याचा वापर १० ते १५ टक्क्यांनी वाढला आहे.

वीजबिल भरणा केंद्र आज सुरू

वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोयीचे व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र रविवारी (ता. ३०) या साप्ताहिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली असून, थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे. चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोयीचे व्हावे, म्हणून साप्ताहिक सुटीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू असणार आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom. in ही वेबसाइट तसेच मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन सोय उपलब्ध आहे. तर, लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.