काळ्या काचेच्या २४ हजार वाहनांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळ्या काचेच्या २४ हजार वाहनांवर कारवाई
काळ्या काचेच्या २४ हजार वाहनांवर कारवाई

काळ्या काचेच्या २४ हजार वाहनांवर कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ : वाहनांना काळ्या काचा लावणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. चालू वर्षात २३ हजार ९४४ वाहनांवर कारवाई करून दोन कोटी ३१ लाख १३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वाहनांना काचा काळ्या करण्यास मनाई असतानाही अनेकजण राजरोसपणे काचांना पूर्णपणे काळ्या रंगाचे स्टिकर्स लावतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर बाब असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत विविध वाहतूक विभागांत जोरदार कारवाई केली जात आहे. या अंतर्गत शुक्रवारी विशेष मोहीमही राबविण्यात आली होती. यामध्ये एका दिवसात ४२२ जणांवर कारवाई करून तीन लाख ४८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. भोसरी विभागांतर्गत सर्वाधिक शंभर जणांवर कारवाई झाली . शुक्रवारी केलेली कारवाई विभागनिहाय - सांगवी -४९, हिंजवडी -२७, निगडी-३०, चिंचवड -१९, पिंपरी-१९, चाकण -३८, देहूरोड-४५, दिघी-आळंदी -११, तळवडे-२१, वाकड - २८, तळेगाव-१७, म्हाळुंगे -१८