महागाईविरोधात आज दुचाकी रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईविरोधात 
आज दुचाकी रॅली
महागाईविरोधात आज दुचाकी रॅली

महागाईविरोधात आज दुचाकी रॅली

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः वाढती बेरोजगारी, वाढती महागाई विरोधात वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाने देशव्यापी अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. त्याअंतर्गत रविवारी (ता. ३०) भोसरीमार्गे दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती वेल्फेअर पार्टीचे अध्यक्ष सालार शेख यांनी दिली.
महागाईमुळे घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला दैनंदिन जीवन जगण्यात अडचण येत आहे. त्यामुळे १५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने हे अभियान राबविण्यात येत आहे. शिवाजी महाराज लांडेवाडी चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा एसबी चौक चिंचवड मार्गे, भक्ती शक्ती चौक, मुंबई पुणे रोड मार्गे अण्णा भाऊ साठे पुतळा येथून दुचाकी रॅली निघेल. भक्ती शक्ती चौक, मुंबई पुणे महामार्ग मार्गे वस्ताद लहुजी साळवे पुतळा चिंचवड चौक, अहिल्याबाई होळकर पुतळा मार्गे मोरवाडी चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे रॅली संपणार आहे.