बावधन येथे गुटख्याचा साठा ; एकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावधन येथे गुटख्याचा साठा ; एकावर गुन्हा दाखल
बावधन येथे गुटख्याचा साठा ; एकावर गुन्हा दाखल

बावधन येथे गुटख्याचा साठा ; एकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० : बेकायदेशीररित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई बावधन येथे करण्यात आली.
गोविंदराम जेपारामजी प्रजापती (रा. विराज रेसिडेन्सी, एनडीए रोड, बावधन खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी सोपान इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने बावधन येथे गुटख्याचा साठा केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार, छापा टाकला असता २३ हजार ३५७ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित सुपारीचा विक्रीसाठी साठा केल्याचे दिसून आले. ही कारवाई नरेंद्र ट्रेडर्स, आदित्य शगुन मॉल शॉप येथे करण्यात आली.