सिंगापूरमधील प्रशिक्षणासाठी अभिश्री रजपूत यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंगापूरमधील प्रशिक्षणासाठी
अभिश्री रजपूत यांची निवड
सिंगापूरमधील प्रशिक्षणासाठी अभिश्री रजपूत यांची निवड

सिंगापूरमधील प्रशिक्षणासाठी अभिश्री रजपूत यांची निवड

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः सिंगापूर येथे एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन रिदमिक जिम्नॅस्टिक कोचेससाठीच्या प्रशिक्षणासाठी ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलच्या प्रशिक्षिका अभिश्री रजपूत हिची रिदमिक जिम्नॅस्टिक्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत निवड झाली आहे. भारतातून फक्त दोनच कोचेसची यासाठी निवड झाली आहे. त्यापैकी अभिश्री यांचा समावेश आहे.
अभिश्री या डायरेक्टर अँड फाउंडर ऑफ कोया फिटनेस ॲकॅडमीचया आहेत. त्या क्रीडाकुलच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी असून, पुढे त्यांनी एमपेड केले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधील पहिली रिदमिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय पंच आहे. तसेच २०१२च्या ऑलिंपिक साठी संभाव्य भारतीय संघाच्या प्राथमिक जिम्नॅस्टिक खेळाच्या कॅम्पमध्ये त्यांची निवड झालेली होती. खेळामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई त्यांनी केली होती. सध्या त्या ज्ञानप्रबोधिनी येथे रिदमिक जिम्नास्टिकचे प्रशिक्षण रोज संध्याकाळी घेतात.
फोटोः 01988