वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी ‘दिशा’ कडून मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी 
‘दिशा’ कडून मदतीचा हात
वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी ‘दिशा’ कडून मदतीचा हात

वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी ‘दिशा’ कडून मदतीचा हात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३० ः सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपले वेगळेपण जपणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील दिशा सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमास भेट दिली. निराधार आजी आजोबांसाठी असलेल्या या आश्रमाचे पक्के बांधकाम सुरू असून, वीट व खडी घेण्यासाठी दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश आश्रमाचे अध्यक्ष विजय जगताप यांच्याकडे सुपूर्द केला. संतोष निंबाळकर, गोरख भालेकर, गुरुदास भोंडवे, संतोष बाबर, राजू कर्पे, नंदू कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. प्रबोधनकार शारदाताई मुंडे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. गोरख भालेकर यांनी यावेळी व्यक्तिगत १० पोती सिमेंट आश्रमास दिले.