प्राधिकरणात चार ठिकाणी दीपोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राधिकरणात चार ठिकाणी
दीपोत्सव उत्साहात
प्राधिकरणात चार ठिकाणी दीपोत्सव उत्साहात

प्राधिकरणात चार ठिकाणी दीपोत्सव उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ ः निगडी प्राधिकरणात वेगवेगळ्या चार ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी प्रज्वलित केलेल्या हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला. महापालिकेच्या माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि राजेंद्र बाबर मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात आला. निगडी प्राधिकरणातील संत तुकाराम महाराज उद्यान, श्री सोमेश्वर मंदिर उद्यान, माऊली उद्यान आणि रामबाग या चार ठिकाणी हा दीपोत्सव साजरा झाला. यामध्ये माजी महापौर आर. एस. कुमार, भाजप पदाधिकारी सलीम शिकलगार, सचिन कुलकर्णी, राधिका बोरळीकर, अतुल इनामदार, विनोद कदम, मंगेश पिसाळ, सुभाष टाक, मीनानाथ इनामदार आदींनी सहभाग घेतला. नागरिकांनी हजारो दिवे प्रज्वलित केले. या दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला. निगडी प्राधिकरणातील भारतीय जनता पार्टी, राजेंद्र बाबर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.