द्रुतगती मार्गावर तिसऱ्या दिवशीही गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती मार्गावर 
तिसऱ्या दिवशीही गर्दी
द्रुतगती मार्गावर तिसऱ्या दिवशीही गर्दी

द्रुतगती मार्गावर तिसऱ्या दिवशीही गर्दी

sakal_logo
By

सोमाटणे, ३१ ः वाहनांची संख्या वाढल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खालापूर व उर्से टोलनाका येथे आज तिसऱ्या दिवशीही वाहनाची गर्दी कायम आहे.
कोरोनामुळे गेले दोन वर्ष नागरिकांना दिवाळीचा सण साजरा करता आला नाही. यंदा खुल्या वातावरणात दिवाळी साजरी करता आली. त्यामुळे शहरी भागातून गावाकडे मोठ्या संख्येने नागरिक गेले होते. काही जणांनी दिवाळी सुटीचा बेत आखून पर्यटनासाठी दूर ठिकाणी जाण्याचा विचार केला होता. परिणामी शहरी भागातून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात व वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. ते सर्व जण सुट्या संपल्याने एकाच वेळी शनिवारपासून परतीच्या प्रवासाला निघाले. परिणामी वाहनांची संख्या वाढल्याने द्रुतगती मार्गावरील खालापूर व उर्से टोलनाका येथे तर पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे व वलवण टोलनाक्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही सर्वच रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढलेली होती. महामार्ग पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडण्याचा सतत प्रयत्न केल्याने कोंडी काहीशी कमी झाली.


Smt31Sf2.