छट पूजा उत्सवाची उत्साहात सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छट पूजा उत्सवाची उत्साहात सांगता
छट पूजा उत्सवाची उत्साहात सांगता

छट पूजा उत्सवाची उत्साहात सांगता

sakal_logo
By

छट पूजा उत्सवाची
उत्साहात सांगता

पिंपरी, ता. ३१ : दोन दिवसांच्या छट पूजा उत्सवाची सोमवारी (ता. ३१) उत्साहात सांगता झाली. विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. उत्तर भारतीय बांधवांचा हा मोठा उत्सव असतो. विधिवत पूजा, आतषबाजी अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात रविवारी या उत्सवाला सुरुवात झाली. या छटपूजेसाठी शहरातील १५ नदी घाटांवर व्यवस्था केली होती. पिंपरी कॅम्पातील झुलेलाल घाटासह पिंपरी गावातील घाट, चिंचवडगावातील मोरया गोसावी घाट, थेरगाव, मोशी, भोसरी तलाव, रहाटणी, देहूरोड येथील घाट यासह इतर ठिकाणी पूजेसाठी गर्दी होती. रविवारी सूर्यास्तावेळच्या पूजेनंतर सोमवारी सकाळीही सूर्योदयावेळी नदीकाठी पूजेसाठी गर्दी झाली होती. गंगा आरती, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. दरम्यान, छट पूजेसाठी महिलांनी केलेले व्रत सूर्योदयावेळी सूर्यपूजा करून सोडण्याची प्रथा आहे. त्यानुसार सोमवारी मनोभावे सूर्यपूजा करून महिलांनी व्रत सोडले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नदीघाटावर उत्साहाचे वातावरण होते.