वृद्धाश्रमातील सोन्याचे दागिने चोरणारा केअर टेकर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धाश्रमातील सोन्याचे दागिने चोरणारा केअर टेकर अटकेत
वृद्धाश्रमातील सोन्याचे दागिने चोरणारा केअर टेकर अटकेत

वृद्धाश्रमातील सोन्याचे दागिने चोरणारा केअर टेकर अटकेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : सूस येथील वृद्धाश्रमातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या केअर टेकरला हिंजवडी पोलिसांनी परभणी येथून अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले.
संकेत माणिकराव झाडे (वय २०, रा. सूस, ता.मुळशी, मूळ -खोक, ता.जिंतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या केअर टेकरचे नाव आहे. या प्रकरणी गोकर्णा बाबासाहेब बाभळकर ( रा. रावीनगर, सूस, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सूस येथील राहत्या घरात वृद्धाश्रम चालवितात. त्यांना या कामात मदत करण्यासाठी केअर टेकर संकेत त्यांच्यासोबत तेथेच राहत होता. दरम्यान, फिर्यादी यांनी १९ ऑगस्ट २०२२ ला येथील किचन रूममध्ये ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते. त्यानंतर, झाडे हा ११ ऑक्टोबर २०२२ ला त्याच्या गावी गेला. १६ ऑक्टोबरला फिर्यादी यांनी किचनमध्ये दागिने शोधले. पण, ते मिळाले नाहीत. त्यानंतर, त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.पोलिसांनी त्याच्याकडून चार सोन्याच्या अंगठ्या, एक ब्रेसलेट व एक सोनसाखळी जप्त केली.