CRI कथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CRI कथा
CRI कथा

CRI कथा

sakal_logo
By

मराठी भाषेतील क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक म्हणजे ‘CRI कथा’. या दिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष आहे. यामध्ये काही माहितीपूर्ण लेख, आठवणी, विश्लेषण, मुलाखती, खेळाडूंचे किस्से व गप्पा गोष्टी आहेत. या अंकासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि कॅनडा येथील लेखकांनी लेखन केले आहे. मराठीतील ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचे मनोगत तसेच, एकेकाळी जगभर बोलबाला असलेल्या श्रीलंकेतील क्रिकेट, श्रीलंकन खेळाडू यांच्याविषयी अविस्मरणीय आठवणी आहेत. या अंकात वाचकांना भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कोच हृषिकेश कानिटकर यांची मुलाखत वाचायला मिळते. कॉमनवेल्थ खेळांमध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. या क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडला गेलेल्या अभिजित देशमुख यांचा आढावा वाचायला मिळतो. तर, भारताच्या राष्ट्रीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जाणारे शार्दूल ठाकूर यांच्या प्रवासाबद्दल त्यांचे वडील नरेंद्र ठाकूर यांची मुलाखत या अंकात आहे. जितेंद्र शेंडे आपल्या लेखामधून रमाकांत आचरेकरांची क्रिकेट प्रेमींना आठवण करून देतात. भारतीय क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून काम केलेले सत्यजित सातभाई, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच विनीत कुलकर्णी यांचे अनुभव वाचायला मिळतात. तसेच, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ इतर संघांपेक्षा वेगळा का आहे ? याची उत्तर आपल्याला या लेखातून मिळतात. एकंदरीत या अंकात अनेक प्रकारच्या लेखांचा समावेश आहे. त्याचबरोबर क्रिकेटमधील मनोरंजन आणि माहिती अशा दोन्ही गोष्टी विचारपूर्वक रसिकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या अंकात झाला आहे.

संपादक : कौस्तुभ चाटे
पृष्ठे : ११२
मूल्य : २५०