आठही प्रभागांमध्ये ‘राष्ट्रीय एकता दौड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठही प्रभागांमध्ये 
‘राष्ट्रीय एकता दौड’
आठही प्रभागांमध्ये ‘राष्ट्रीय एकता दौड’

आठही प्रभागांमध्ये ‘राष्ट्रीय एकता दौड’

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः महापालिकेच्यावतीने आठही प्रभागांमध्ये आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय एकता दौड’मध्ये शहरवासीयांनी उस्त्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. देशाची एकता, अखंडता तसेच सुरक्षितता जपण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देखील यावेळी घेतली.
सरकारच्या आदेशानुसार राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते आठ या वेळेत सुमारे शंभर ठिकाणी राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने महापालिकेने शहरातील आठही प्रभागांमध्ये एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील माजी पदाधिकारी, नगरसदस्य, अनेक संघटना, क्रीडा संस्था, बेसिक्स संस्था, डिव्हाईन संस्थेचे सदस्य, खेळाडू, विविध योगा ग्रुपचे सदस्य, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राष्ट्रीय अबाधित राहण्यासाठी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.