लाडोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाडोबा
लाडोबा

लाडोबा

sakal_logo
By

वाचनाची सवय लहानपणापासून लागली तर मुलांच्या मनोविश्वावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे बालचमुंना वाचनाकडे आकर्षित करणारा हा अंक आहे. या दिवाळी अंकात रहस्य, थरार, गूढ, अद्भुतरम्य अशा विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. त्यामुळे मुलांना आपापल्या आवडीनुरुप विपुल साहित्य उपलब्ध आहे. या अंकात कथा, लेख, कविता आणि चित्र आहेत. शिवाजी तांबे यांचा ‘बालपणाची निमंत्रणे’, शिरीष देशमुख यांचा ‘संजू तप करतो’, पूजा देखणे यांचा ‘घोडा की घोडेस्वार’, प्रशांत केंदळे यांचा ‘बालचित्रकार मयुरेश आढाव’, जोसेफ तुस्कानो यांचा ‘नारायणमूर्तींची सिंधू’, सदानंद भणगे यांचा ‘आजोबांची दिवाळी’, समाधान शिकेतोड यांचा ‘शेंगदाण्याचा लाडू’, सायली कस्तुरे यांचा चांदोबाच रहस्य’, दीपक पारखी यांचा ‘आकाशकंदील’, अशा अनेकविध कथा व लेख आपणास वाचायला मिळतात. शिवाय, क्यू आर कोड स्कॅन करून कथा व कवितेचे व्हिडिओ पाहू शकतो. तसेच, युवा अकादमी पुरस्कार विजेत्या ऐश्वर्य पाटेकर यांचा ‘लहान पोर समजून सगळे फसवत राही’, प्रमोद चिंचोले यांचा ‘लेक आमची लाडोबा’, एकनाथ आव्हाड यांचा ‘मित्र’ अशा अनेक कविता आहेत. अंकाच्या शेवटी बालचमुंनी अनेक विषयांवर रेखाटलेले आकर्षक चित्र बघायला मिळतात.

संपादक : घनश्याम पाटील
पृष्ठे : १००
मूल्य : २४०