एड्स बाधितांना फराळाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एड्स बाधितांना
फराळाचे वाटप
एड्स बाधितांना फराळाचे वाटप

एड्स बाधितांना फराळाचे वाटप

sakal_logo
By

एड्स बाधितांना
फराळाचे वाटप
पिंपरी, ता. १ : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड चाकण व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स बाधित मुलांना व पालकांना दिवाळीच्या भेटवस्तूंसह मिठाई, फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच, किराणा देखील देण्यात आला. त्यांचे आरोग्य नीट राहावे, यासाठी सकस आहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला महिंद्रा कंपनीचे सनी लोपेज व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. दिवाळीच्या सणाप्रमाणे एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य आनंदमय राहावे, अशी इच्छा लोपेझ यांनी व्यक्त केली. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी चाकण, मंचर, खेड येथील भागातून पालक उपस्थित होते. रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.