भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या
भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या

भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या

sakal_logo
By

पिंपरी, ता.१ ः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कार्यालय इमारत आणि कर्मचारी वसाहत बांधण्यासाठी हिंदुस्थान अँन्टिबायोटिक्स लिमिटेडकडून साडेतीन एकर जमीन घेतली आहे. त्यावर उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीची पायाभरणीचा कार्यक्रम मंगळवारी (ता.१) झाला. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून ऑनलाइन पद्धतीने पायाभरणी केली.

पिंपरीतील हिंदुस्तान अँन्टिबायोटिक्स लिमिटेड आवारामध्ये हा कार्यक्रम झाला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी येथे भूमिपूजन केले. केंद्रीय विश्‍वस्त मंडळ ईपीएफओचे सदस्य प्रभाकर बानासुरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती अहुजा, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त नीलम शमी राव, अपर केंद्रीय क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त एम.एस. के. व्ही. व्ही. सत्यनारायण, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त एक अमित वशिष्ठ (गोळीबार मैदान), क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त-एक पुणे (आकुर्डी) के. रवींद्र कुमार, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त (२) मनोज माने, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त- २ आकुर्डी ईपीएफओ कार्यालयाचे आदित्य तलवारे, सचिव ईपीएफ कर्मचारी युनियन आकुर्डीचे दिनेश शेलार आदी उपस्थित होते.
--
कोट
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्गाच्या फायद्यासाठी सेवा सुरू होत आहे. कार्यालयाची सुंदर वस्तू येथे निर्माण होणार आहे. त्याचा फायदा सर्व पीएफ लाभधारकांना होणार आहे.’’
--
अशी असेल इमारत
केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेडकडून ३.५ एकर जमीन पुणे क्षेत्रीय कार्यालय इमारत आणि निवासी क्वार्टर्स बांधण्यासाठी घेण्यात आली आहे. इमारतीत सात मजले आणि निवासी क्वार्टर्स असतील. त्यांचा एकूण बिल्टअप एरिया ३१ हजार ७७०.४३ चौरस मीटर असेल.
PNE22T02355