मोटारीची रिक्षाला धडक; चालक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटारीची रिक्षाला धडक; चालक जखमी
मोटारीची रिक्षाला धडक; चालक जखमी

मोटारीची रिक्षाला धडक; चालक जखमी

sakal_logo
By

पिंपरी, ता.२ : भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाल्याची घटना पिंपरी येथे घडली.
नामदेव बब्रुवान टमके (रा. गणेश कॉलनी, तापकीरनगर, गंधर्वनगरी, मोशी) असे या अपघातात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मोटार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे नेहरूनगरकडून झिरो बॉइज चौकाकडे जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या आरोपीच्या मोटारीने त्यांच्या रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले. तसेच रिक्षाचेही नुकसान झाले. अपघातानंतर मोटार चालक घटनास्थळावरुन पसार झाला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.