‘डॉ. डी. वाय. पाटील’च्या आटर्स विभाग संचालकपदी कपोते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डॉ. डी. वाय. पाटील’च्या
आटर्स विभाग संचालकपदी कपोते
‘डॉ. डी. वाय. पाटील’च्या आटर्स विभाग संचालकपदी कपोते

‘डॉ. डी. वाय. पाटील’च्या आटर्स विभाग संचालकपदी कपोते

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांची नुकतीच डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स विभागाचे संचालक म्हणून विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी नियुक्ती केली. डॉ. कपोते यांना नियुक्तीचे पत्र कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी डॉ. नरेंद्र कडू उपस्थित होते. विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स विभाग सुरू झाला असून याद्वारे कथक, भरतनाट्यम, नृत्य, योगा, नृत्यदिग्दर्शन या विषयात विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स शिकविले जाणार आहे. डॉ. नंदकिशोर कपोते हे ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गुरूदेव रविशंकर यांची श्री श्री युनिव्हर्सिटी कटक, श्री. छत्रपती शिवाजीमहाराज युनिव्हर्सिटी पनवेल येथे नृत्य विषयासाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.