अध्यात्माच्या गोडीसाठी मुलांसाठी ‘माऊली’ लघुपट कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यात्माच्या गोडीसाठी
मुलांसाठी ‘माऊली’ लघुपट 
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
अध्यात्माच्या गोडीसाठी मुलांसाठी ‘माऊली’ लघुपट कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अध्यात्माच्या गोडीसाठी मुलांसाठी ‘माऊली’ लघुपट कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २ ः लहान मुलांना अध्यात्माची गोडी लागावी, वारकरी सांप्रदायिक संतांच्या चरित्राची माहिती व्हावी, या उद्देशाने पुण्यातील ॲड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनतर्फे माऊली या नावाचा आध्यात्मिक लघुपट (ॲनिमेटेड) तयार करण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला (ता. ४) त्याचे प्रकाशन होणार आहे.
नव्या पिढीपर्यंत संतांची उज्ज्वल परंपरा अपेक्षेप्रमाणे पोचत नाही. गेल्या काही वर्षांपासून कमी वयातील मुलेही मोबाईल, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या बाबींचा विचार करून मुलांना वारकरी सांप्रदायिक संतांची माहिती मुलांना व्हावी, त्यांचे विचार, चरित्रांमधून त्यांना जीवन अधिक सक्षमपणे जगता यावे, यासाठी पुण्यातील ॲड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. संतांच्या चरित्रातील प्रसंगांवर आधारित ॲनिमेटेड फिल्म सादर करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यानुसार, वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रापासून याला सुरवात करण्यात येणार आहे. या अॅनिमेटेड फिल्ममध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील काही प्रसंगांची माहिती देण्यात येणार आहे. त्यातून नव्या पिढीपर्यंत संतांची माहिती पोचेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित माऊली ही फिल्म तयार केली आहे. या लघुपटात दोन भजने असून, ती शांताराम महाराज निम्हण यांनी गायली आहेत. लघुपट सहा मिनिटांचा आहे.


सध्याच्या काळात लहान मुलांनाही मोबाईलचे आकर्षण वाढत आहे. मात्र, अन्य काही गेम्स किंवा हाणामारीचे प्रसंग पाहण्यापेक्षा त्यांना संतांच्या चरित्रातील प्रसंगाची माहिती व्हावी, या उद्देशाने माऊली ही फिल्म प्रसारित करण्यात येणार आहे. या पुढील काळात वारकरी सांप्रदायातील एकूण तेरा संतांच्या चरित्रावर बाल लघुपट (ॲनिमेटेड) करण्यात येणार आहे.
- अॅड. माधवी निगडे, प्रमुख, माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन.