जैन दिवाकर पू.श्री चौथमलजी म.सा.यांच्या जन्म जयंती सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जैन दिवाकर पू.श्री चौथमलजी म.सा.यांच्या जन्म जयंती सप्ताह
जैन दिवाकर पू.श्री चौथमलजी म.सा.यांच्या जन्म जयंती सप्ताह

जैन दिवाकर पू.श्री चौथमलजी म.सा.यांच्या जन्म जयंती सप्ताह

sakal_logo
By

पिंपरी, ता.३ : साहित्यरत्न जैन दिवाकर श्री चौथमलजी यांच्या जयंती सप्ताहाचे आयोजन श्री भोसरी जैन श्रावक संघ यांच्यावतीने करण्यात आले. सप्ताहानिमित्त विविध तपसाधना आदी उपक्रमांचे आयोजन केले होते. जैन साध्वी दिवाकर रश्मी, डॉ. सुशीलजी, गायिका साध्वी श्रद्धाजी यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती, संगीत, आदिनाथ भक्तामर स्तोत्र अनुष्ठान, जैन कुलरक्षिका माता पद्मावती देवी आराधना एकासना उपवासाने सप्ताहाचा समारोप झाला.
या चातुर्मासामध्ये आयोजित ४६ वी नवपद आयंबील ओळीमध्ये सुमारे अडीचशे भाविकांनी सहभाग घेतला होता. आयंबिल ओळीचे आयोजन धनंजय व पुष्पा मुथियान परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. माता पद्मावती आराधना व्रतामध्ये साठ महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष राजेंद्र चोरडिया, सुभाष चूत्तर, डॉ.जवाहरलाल भळगट, मदनलाल कर्नावट, कार्याध्यक्ष सागर साखला, गिरीश मुथियान, कचरदास गांधी, डॉ.प्रदीप गांधी, शांतीलाल शाळ, नंदलाल लुंकड, प्रमोद चूत्तर, मदनलाल चोरडिया, किरण कटारिया, हस्तीमल गुगळे, विजय पारख, अभय हिरण, मनोज गांधी यांनी केले.