महापालिकेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या कामांची
चौकशी करण्याची मागणी
महापालिकेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

महापालिकेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘कॅग’ चौकशीच्या धर्तीवर महापालिकेच्या खालील प्रकल्पात व कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची ‘कॅग’मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या सुमारे बारा हजार कोटी रक्कमेच्या ७६ प्रकल्पांतील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आपण विधिमंडळांमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे चौकशीची शिफारस कॅगकडे केली. या चौकशीला तातडीने मंजुरी मिळून ही चौकशी होत आहे. या निर्णयाचे स्वागत करतो. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत अभिनंदन करतो. मात्र, अशाच प्रकारचे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार महापालिकेमध्ये मागील पाच वर्षांत झाले आहेत. त्यामुळे सुमारे ४२ प्रकरणांची मुंबई महापालिकेप्रमाणेच तातडीने महापालिकेची देखील कॅगमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची प्रत त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही पाठविली आहे.

अशा आहेत मागण्या
- महापालिकेतील प्रकरणांमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार
- शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी डेपोपर्यंत वाहतूक करणे यातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार
- ३१ मार्च २०१७ नंतरचे ठेकेदारांची बिले अडवून मुख्यमंत्र्यांची फसवणूक करून ३०० कोटी रुपये वाचवण्याचा खोटा दावा करून केलेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार
- निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर आनुषंगिक कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार
- शहरातील रस्ते विकासाच्या सव्वाचारशे कोटीच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार अशा प्रकरणांमध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची चौकशी कॅगमार्फत करावी