आकुर्डी इस्कॉनतर्फे ‘वृद्धाश्रम सेवा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकुर्डी इस्कॉनतर्फे ‘वृद्धाश्रम सेवा’
आकुर्डी इस्कॉनतर्फे ‘वृद्धाश्रम सेवा’

आकुर्डी इस्कॉनतर्फे ‘वृद्धाश्रम सेवा’

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : इस्कॉन श्री गोविंद धामद्वारे समाजसेवा उद्देशाने सुरू केलेला भारत-संस्कृती विकास उपक्रम कार्यान्वित झाला आहे. या उपक्रमाचा प्रथम भाग ‘वृद्धाश्रम सेवा’ अतिशय उत्साही व आनंदमय, भक्तिमय वातावरणात झाला.

​आकुर्डी येथील संत बाबा मौनीसाहेब वृद्धआनंदआश्रम या ठिकाणी इस्कॉन मंदिरद्वारे वृद्धांच्या आनंदासाठी सुश्राव्य भजन कीर्तन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथांची आरती करून दामोदर भगवंतांना दीपदान केले. गोपती प्रभू व रोहिणी कुमारप्रभू यांच्याद्वारे आश्रमवासीयांना प्रवचन व मार्गदर्शन झाले. आश्रमातील प्रत्येक सदस्यांना भगवद्गगीता व नामस्मरण साहित्य देण्यात आले. तसेच, आश्रमासाठी सामूहिकरीत्या पुस्तक संच, श्रीमद्भागवत ग्रंथ संच तसेच मासिक पत्रिकेचे आजीवन सभासदत्व अध्यक्ष अशोक खौसला यांच्याकडे देण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन, व्यवस्थापन व सूत्रसंचालन भारत-संस्कृती विकास उपक्रमाचे प्रमुख जडभरत दासब्रह्मचारी यांनी केले. ते म्हणाले, ‘या उपक्रमामध्ये भारतीय संस्कृतीचे जतन व प्रचार, गोसेवा-गोरक्षा, ग्रंथ वितरण, समाज प्रबोधन, बालसंस्कार, सेंद्रिय शेती, ग्राम विकास, अनाथाश्रम-वृद्धाश्रम तसेच शहीद जवान परिवार सेवा, पीडित रूग्ण व समाज सेवा आदि उपक्रम राबविण्याचा विचार आहे.

​समाजसेवा करणारा समूह इस्कॉनच्या या उपक्रमात सहभागी झाला असून त्यांच्याद्वारे आश्रमातील सर्व सदस्यांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. सर्वांना अन्नदान प्रसाद वितरित करण्यात आले. दान सोहळ्यामध्ये इस्कॉनचे अनेक साधक व समाज सेवा करणारे कार्यकर्ते सहभागी झाले होते.