पिंपरी चिंचवड येथे ९ ते १२ नोव्हेंबर किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी चिंचवड येथे ९ ते १२ नोव्हेंबर किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
पिंपरी चिंचवड येथे ९ ते १२ नोव्हेंबर किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पिंपरी चिंचवड येथे ९ ते १२ नोव्हेंबर किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : शहरात येत्या बुधवारपासून (ता. नऊ) तीन दिवसीय ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ होत आहे. सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज असा यंदाचा विषय आहे. महोत्सवाचे आयोजन वसुंधरा क्लबच्या सहयोगाने जलदिंडी प्रतिष्ठानने केले आहे.

महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विषयाला अनुसरून चित्रपट दाखवले जाणार आहेत. शिवाय शॉर्ट फिल्म व बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच, वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रे होतील. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयडिया चॅलेंज २०२२ हे विशेष चर्चासत्र आहे. मोरया गोसावी मंदिराच्या प्रांगणात ग्रीन बझार आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आकर्षण असेल.

ताथवडेमधील जे.एस.पी.एम. महाविद्यालयात सकाळी दहाला महापालिका आयुक्त शेखर सिंग व पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. समारोप शनिवारी सकाळी १०.३०ला भोसरीतील क्वालिटी सर्कल येथे होणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके प्रमुख उपस्थित असतील.
--
विविध पुरस्कार जाहीर
समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे (वसुंधरा सन्मान), छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर (वसुंधरा मित्र), ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार पीतांबर लोहार (वसुंधरा इको जर्नालिस्ट), डॉ. श्रीकृष्ण जोशी (वसुंधरा मित्र, निसर्गराजा मैत्र जिवांचे संस्था आणि आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पीटल (वसुंधरा मित्र संस्था) यांना पुरस्काराने सन्मानित जाणार आहे, अशी माहिती जलदिंडी प्रतिष्ठानचे राजीव भावसार आणि महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली आहे.