सारथीवरील हेल्पलाईन सक्षम होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सारथीवरील हेल्पलाईन सक्षम होणार
सारथीवरील हेल्पलाईन सक्षम होणार

सारथीवरील हेल्पलाईन सक्षम होणार

sakal_logo
By

पिंपरी, ता.३ ः नागरिकांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेली ‘सारथी हेल्पलाइन’ सक्षम करण्यावर प्रशासक शेखर सिंह यांनी लक्ष केंद्रित केले. एखादी तक्रार तिसऱ्यांदा सारथीवर आली. तर संबंधित विभागाचे अतिरिक्त आयुक्त हे तक्रारीचे निवारण करणार आहेत.
महापालिकेशी निगडित येणाऱ्या समस्या, तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अनेक अधिकारी दुर्लक्ष करत होते. तसेच तक्रार न सोडविताच ती बंद केली जात होती. त्यामुळे, तक्रारींची संख्या वाढत होती. सिंह यांनी गेल्या महिन्यात सारथीचा आढावा घेत १५ दिवसांपेक्षा जास्त एखादी तक्रार प्रलंबित ठेवल्यास तक्रार का प्रलंबित ठेवली, याची विभागप्रमुखांना कारणे द्यावी लागतील, असा इशारा दिला आहे.