जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे पिंपरीत आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक 
स्पर्धेचे पिंपरीत आयोजन
जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे पिंपरीत आयोजन

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे पिंपरीत आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः शहरामध्ये जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे दिनांक ५ ते ७ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अलाईट जिम्नॅस्टिक अँड फिटनेस ॲकॅडमीचे अध्यक्ष मनोज काळे यांनी दिली. महाराष्ट्र ॲमेचुर जिम्नॅस्टिक असोसिएशन यांची १० ते १२ नोव्हेंबर रोजी डेरवण (चिपळूण) येथे मिनी व सब ज्युनिअर आर्टिस्टिक व ॲरोबिक्स जिम्नॅस्टिकची राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सर्व संलग्न जिल्हा संघटना युनिटने जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक असोसिएशनची मुले व मुली यांची स्पर्धा ठरली असून, मुलींची स्पर्धा निगडीतील एस. पी. एम. स्कूल येथे शनिवारी (ता. ५) रोजी अलाईट जिम्नॅस्टिक अँड फिटनेस ॲकॅडमीत होणार असून मुलांची स्पर्धा रविवारी (ता. ६) ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात होणार आहे. तसेच ॲरोबिक्स जिम्नॅस्टिकची स्पर्धा सोमवारी (ता. ७) रहाटणीतील हेवन जिम्नॅस्टिक अकादमी काकाज इंटरनॅशनल स्कूल येथे होणार आहे. निवड झालेला संघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेसंदर्भात माहिती अलाईट जिम्नॅस्टिक अँड फिटनेस ॲकॅडमीचे अध्यक्ष मनोज काळे यांनी दिली.