स्वच्छता ठेवा, चॅम्पियन व्हा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता ठेवा, चॅम्पियन व्हा !
स्वच्छता ठेवा, चॅम्पियन व्हा !

स्वच्छता ठेवा, चॅम्पियन व्हा !

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशात पिंपरी चिंचवड शहर अव्वल स्थानावर यावे, यासाठी महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छतेबाबत उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सहभागी नागरिक, नागरिकांचा गट, सीएसआर प्रतिनिधी, स्वयंसेवक आणि बचतगट यांना ‘स्वच्छता चॅम्पियन्स’ म्हणून महापालिकेच्यावतीने गौरविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये नागरिक तसेच समाजातील सर्व घटकांनी व्यापक स्वरूपात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

‘स्वच्छता चॅम्पियन्स’ या उपक्रमात सहभागी होण्याऱ्या नागरिकांचे वय १८ किंवा त्यापेक्षा अधिक असावे. या उपक्रमात सहभागी नागरिक किंवा नागरिकांचा गट पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असावा. महापालिकेच्या वतीने १० महिला व १० पुरुष यांची स्वच्छता चॅम्पियन्स करिता निवड करण्यात येणार आहे. त्यांना कोणत्याही स्वरूपाचे रोख बक्षीस देण्यात नसून महापालिकेच्यावतीने त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिक किंवा नागरिकांच्या गटाने “स्वच्छता चॅम्पियन्स” असा विषय नमूद करुन आपण केलेल्या स्वच्छता विषयक (आयईसी, कचऱ्यापासून खतनिर्मिती, वृक्षारोपण, कचऱ्यापासून विविध वस्तू तयार करणे, पुनर्वापर, टाकाऊपासून टिकाऊ आदी.) उत्कृष्ट कार्याची किमान ५० शब्दांत माहिती देणे आवश्यक आहे. व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव, संपर्क क्रमांक, कामकाज करतानाच्या फोटोसहीत sbm2020@pcmcindia.gov.in यावर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ पर्यंत पाठवावी. त्यानंतर आलेली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही, अशी माहिती महापालिकेचे स्वच्छ भारत समन्वयक विनोद जळक यांनी दिली आहे.