ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात पालखेड लढाईची प्रतिकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात पालखेड लढाईची प्रतिकृती
ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात पालखेड लढाईची प्रतिकृती

ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात पालखेड लढाईची प्रतिकृती

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः जगप्रसिद्ध पालखेडची लढाई दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून पाहण्याची संधी बालचमूंना अनुभवायला मिळणार आहे. मातृमंदिर विश्‍वस्त संस्था व ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी केंद्र यांच्या वतीने लढाई रणांगणाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून दृकश्राव्य माध्यमातून लढाईची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली जात आहे. वीस मिनिटांच्या चित्रफितीला सुमारे २०० चौरस फूटातील युद्धभूमीची व एलईडी दिव्यांची जोड दिली आली आहे. पेशवा बाजीराव व निजाम उल मुल्क यांच्यातील संघर्षातील ही गाथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली रघुराज एरंडे व व ऋषिकेश परदेशी यांनी ही प्रतिकृती तयार केली आहे. इतिहास अभिरुची गटाचे आजी व माजी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाची व्यवस्था पाहिली आहे. निःशुल्क असणारे हे प्रदर्शन १६ नोव्हेंबर पर्यंत सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात पाहता येणार आहे. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संस्थेचे कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे यांनी केले आहे.
२८३१,२८३२