यंग बझ्ज सिटी प्राईडच्या “सुपर अचिव्हर्स” चे सुपर यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंग बझ्ज सिटी प्राईडच्या “सुपर अचिव्हर्स” चे सुपर यश
यंग बझ्ज सिटी प्राईडच्या “सुपर अचिव्हर्स” चे सुपर यश

यंग बझ्ज सिटी प्राईडच्या “सुपर अचिव्हर्स” चे सुपर यश

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः निगडी येथील सिटी प्राइड शाळेत ‘सुपर अचिव्हर्स’ हा कौतुक सोहळा झाला. या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर) आणि बारावी परीक्षेनंतरच्या आयआयटी, जेईई आणि इतर ऑलिंपियाडच्या स्पर्धा, पर्यावरण व विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात एकूण २१६ पदके प्रदान करण्यात आली. त्यापैकी १८४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके मिळाली तर ३२ विद्यार्थी रौप्य पदकांचे मानकरी ठरले. या वर्षी ‘बाकलीवाल क्लासेस’ चे संचालक वैभव बाकलीवाल व ‘एस ओ एफचे समन्वयक तावरे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, डॉ. दीपाली सवाई, निगडी शाखेच्या मुख्याध्यापिका माया सावंत, मुख्याध्यापिका सुमेधा फडके, सुजा राजेश , शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका माया सावंत यांनी अहवाल वाचन केले. मुख्याध्यापिका सुमेधा फडके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन लीना जाधव यांनी केले. मोशी शाखेच्या मुख्याध्यापिका सुजा राजेश यांनी आभार मानले. शालेय स्पर्धा परीक्षा विभागातर्फे सुवर्णा सहस्रबुद्धे व स्वाती भगत आणि शिक्षकांनी आयोजन केले.
फोटो ः 02850