निगडी येथे पालखेड लढाईवर प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडी येथे पालखेड लढाईवर प्रदर्शन
निगडी येथे पालखेड लढाईवर प्रदर्शन

निगडी येथे पालखेड लढाईवर प्रदर्शन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः जगप्रसिद्ध पालखेडची लढाई दृकश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून पहाण्याची संधी बालचमूंना मिळणार आहे. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात १६ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले राहणार आहे.
मातृमंदिर विश्‍वस्त संस्था व ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने पालखेड लढाईच्या रणांगाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून लढाईची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली जात आहे. वीस मिनिटांच्या दृकश्राव्य चित्रफितीला सुमारे २०० चौरस फूटांतील युद्धभूमीची व एलईडी दिव्यांची जोड देण्यात आली आहे. बाजीराव पेशवे व निजाम उल मुल्क यांच्यातील संघर्षातील गाथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांचे मार्गदर्शनाखाली रघुराज एरंडे व व ऋषिकेश परदेशी यांनी ही प्रतिकृती तयार केली असून इतिहास अभिरुची गटाचे आजी व माजी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाची व्यवस्था पाहिली आहे. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहील. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संस्थेचे कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे यांनी केले आहे.

२८३१,२८३२