तुळशीविवाहास उत्साहात प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळशीविवाहास उत्साहात प्रारंभ
तुळशीविवाहास उत्साहात प्रारंभ

तुळशीविवाहास उत्साहात प्रारंभ

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : तुळशीविवाह सोहळ्याला शनिवारपासून (ता.५) शहरात उत्साहात प्रारंभ झाला. ८ नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा सोहळा रंगणार आहे. सोहळ्यासाठी शहर व परिसरात दिवसभर लगबग होती. ऊस, हारफुले, लाह्या, रांगोळी यासह पूजेसाठी लागणारे चिंच, आवळा, फळे व फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती. अंगणातील तुळशीवृंदावनाला रंग देवून सुंदर सजवले. रोषणाई यासह इतरही सजावट केली होती. तुळशीवृंदावनासमोर सुंदर रांगोळी साकारली होती. सायंकाळी घरोघरी विवाहसोहळ्याला सुरुवात झाली. कुटुंबातील सदस्यांसह इतरही मंडळी नवीन वस्त्र परिधान करून या सोहळयास उपस्थित होते. मनोभावे पूजा करून गोडधोड नैवेद्यही अर्पण करण्यात आला.