ग्रामीण भागातील पीएमपीएलचे मार्ग बंद करू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातील पीएमपीएलचे 
मार्ग बंद करू नका
ग्रामीण भागातील पीएमपीएलचे मार्ग बंद करू नका

ग्रामीण भागातील पीएमपीएलचे मार्ग बंद करू नका

sakal_logo
By

ग्रामीण भागातील काही मार्ग पीएमपीएमएल प्रशासनाने बंद करायचे जाहीर केले आहे. त्यात लोणावळा बस आहे. कंडक्टर जवळच्या अंतराचे तिकीट १० रुपये असताना प्रवाशांकडून पाच रुपये घेतात. काही ठिकाणी लांब पल्याचे तिकिटाचे निम्मे पैसे घेऊन प्रवाशांची सेवा करतात. प्रवासी खुश कंडक्टर खुश होतात. त्यामुळे हे तोट्यातील मार्ग दाखवून प्रशासन मात्र मार्ग बंद करतात. हे सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे. परंतु, यावर कुणीही आवाज उठवत नसल्याने असे मार्ग बंदच राहतील. प्रवाशांना मात्र नाहक दुप्पट खर्च करावा लागतो. कमी अंतरावर खूप गर्दीच्या मार्गावर असले प्रकार सर्रास चालतात. यावर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासन बस मार्गच बंद करतात. स्थानिक आमदार खासदारांनी याचा जाब प्रशासनाला विचारला पाहिजे. तळेगाव चाकण, औद्योगिक परिसर, इंद्रायणी कॉलेज, गाव स्टेशन व ग्रामीण भागात असे प्रकार गेली कित्येक वर्षे चालू आहे. भरारी पथक काही वेळा दिसते. पुन्हा ती पथके दिसत नाहीत. त्याचा गैरफायदा काही कंडक्टर आणि ड्राईव्हर घेत आलेत. प्रशासनाने यावर उपाय करून आहे तेच मार्ग चालू ठेवावेत. विद्यार्थ्यांना आणि जेष्ठ नागरिकांना या बससेवेचा खूप फायदा आहे.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे