शिवशक्ती सोसायटीचा कारभार गुंडाळल्याने खातेदारांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशक्ती सोसायटीचा कारभार गुंडाळल्याने खातेदारांचे नुकसान
शिवशक्ती सोसायटीचा कारभार गुंडाळल्याने खातेदारांचे नुकसान

शिवशक्ती सोसायटीचा कारभार गुंडाळल्याने खातेदारांचे नुकसान

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : शिवशक्ती को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या भ्रष्टाचारामुळे हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये बुडविण्याचा हेतू आहे. सोसायटी कारभार गुंडाळल्याने खातेदारांचे नुकसान झाले आहे. प्रशासकांवर अतिरिक्त भार असल्याने ते काहीच काम करत नाहीत. संचालक मंडळ कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून मस्तवालपणे जगत आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली बोराटे यांनी सहकार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणात सहकार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बोराटे यांनी म्हटले आहे की, शिवशक्ती को-ऑप. क्रेडिट सोसायटी, मुंबईमध्ये शेकडो खातेदार जे पुणे जिल्ह्यातून मुंबईत राहावयास आहेत. त्यांचे लाखो रुपये या सोसायटीमध्ये गुंतवणूक केली आहे. परंतु; या सोसायटीचे संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला. त्यांनी घोटाळा केला असल्यामुळे या सर्व खातेदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. खातेदारांच्यावतीने सहकार खात्याच्या विरोधात आम्ही गेले तीन वर्षे मोर्चे, आंदोलने, निदर्शने केली. त्यानंतर सहकार आयुक्तांनी या सोसायटीवर प्रशासक म्हणून नवनाथ अनपट यांची नियुक्ती केली आहे. परंतु; नवनाथ अनपट यांच्याकडे सहकार खात्याचे अन्य अतिरिक्त भार असलेले असल्याने ते काहीच काम करीत नाहीत, असा आरोप बोराटे यांनी निवेदनात केला आहे.

शिवशक्ती क्रेडीट सोसायटीवरील प्रशासक नवनाथ अनपट यांच्यावर दबाव आहे, असे आमच्या निदर्शनास येत आहे. संचालक मंडळ हे नागरिकांचे लाखो-करोडो रुपये भ्रष्टाचारी मार्गाने कमवून मस्तवालपणे जगत आहेत. त्यामुळे सहकार आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सर्व खातेदारांना न्याय द्यावा, अशी ग्राहक, खातेदारांची विनंती आहे.
- ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली बोराटे, सामाजिक कार्यकर्ते, मोशी