पिंपरीतील मंडईमध्ये पालेभाज्यांची दुप्पट आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीतील मंडईमध्ये  
पालेभाज्यांची दुप्पट आवक
पिंपरीतील मंडईमध्ये पालेभाज्यांची दुप्पट आवक

पिंपरीतील मंडईमध्ये पालेभाज्यांची दुप्पट आवक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत पाऊस थांबल्याने गत आठवड्याच्या तुलनेत (ता. ६) रविवारी या आठवड्यात पालेभाज्यांची आवक दुपटीने वाढली आहे. मंडईत नियमित ४ ते ६ हजार गड्डीप्रमाणे येणाऱ्या पालेभाज्या ९ हजार गड्डीच्यावर दाखल झालेल्या आहेत.
नुकतीच दिवाळीपूर्वी काही दिवस आधी पावसाने विश्रांती घेतली आहे. इतके दिवस चिखलामुळे पालेभाज्यांची आवक मंडईत मंदावली होती. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या पाऊस ओसरल्यानंतर थंडी सुरु झाली आहे. त्यामुळे, फळभाज्यांची आवक नियमितप्रमाणे स्थिर असून, पालेभाज्यांची आवक चांगली वाढली आहे. किरकोळ दराने पालेभाज्यांची विक्री महाग आहे. परंतु, ठोक दराने फळभाज्या व पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत.
---
फळभाज्यांचे दर किलोप्रमाणे रुपयांमध्ये -
कांदा : २३ ते २६, भेंडी : २५ ते ३०, गवार : ४५, टोमॅटो : १५ ते२०, दुधी भोपळा : २५ ते ३०, काकडी : २१ ते २२, फ्लॉवर : १५ ते १८, कोबी : २२ ते २५, वांगी : ५०, घोसाळी : ३५ ते ४०.

पालेभाज्यांचे दर गड्डीप्रमाणे रुपयांमध्ये -
कोथिंबीर : ९ ते १०, शेपू : ८ ते ९, चवळी : ७ ते ८, करडई : ७, पुदिना : ४, अंबाडी ६ ते ७
---
मंडईत रविवारी झालेली आवक :
फळभाजी : ६३ क्विंटल
पालेभाजी : ९२०० गड्डी