पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय ः ऑनलाईन अर्ज ९ नोव्हेंबरपासून भरता येणार शिपाईपदाच्या २१६ जागांसाठी भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय ः ऑनलाईन अर्ज ९ नोव्हेंबरपासून भरता येणार  
शिपाईपदाच्या २१६ जागांसाठी भरती
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय ः ऑनलाईन अर्ज ९ नोव्हेंबरपासून भरता येणार शिपाईपदाच्या २१६ जागांसाठी भरती

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय ः ऑनलाईन अर्ज ९ नोव्हेंबरपासून भरता येणार शिपाईपदाच्या २१६ जागांसाठी भरती

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात शिपाई पदाच्या २१६ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी ९ नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यामुळे आयुक्तालयात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी १५ ऑगस्ट २०१८ मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन झाले. हद्द वाढली तसेच त्याअंतर्गत येणारी लोकसंख्याही वाढली. मोठ्या औद्योगिक क्षेत्रांसह तीर्थक्षेत्रांचाही आयुक्तालयाच्या हद्दीत समावेश आहे. मात्र, सुरुवातीपासूनच अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न कायम आहे. यामुळे सध्याच्या उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रशासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरु आहे.
दरम्यान, मागील वर्षी शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी भरती झाली. यामधील पात्र उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. ते लवकरच हजर होतील. अशातच आता पुन्हा २१६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी ९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइनद्वारे अर्ज करता येईल. अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारिरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळविणाऱ्यांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
शारीरिक व लेखी चाचणीत नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारातून एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, कागदपत्रे, आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, अर्ज सादर करण्याबाबतची माहिती व उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment२०२२. mahait.org, www. mahapolice.gov.in व www. pcpc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------

जोरात तयारी

पोलिस दलात दाखल होण्यासाठी अनेक तरुण तयार करीत आहेत. भरतीची घोषणा झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया कधी सुरु होणार याकडे तरुणांचे लक्ष लागले होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. अर्ज भरून इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासह शारीरिक व लेखी चाचणीसाठीची तयारीही जोरात सुरु आहे.
--------------

आयुक्तालयातील मंजूर व हजर मनुष्यबळ

पद मंजूर पदे हजर पदे रिक्त पदे

आयुक्त १ १ --
अपर आयुक्त १ १ --
उपायुक्त ३ ३ --
सहायक आयुक्त ८ ६ २
निरीक्षक ६८ ६५ ३
सहायक निरीक्षक ८८ ७७ ११
उपनिरीक्षक २१९ १७३ ४६
सहायक उपनिरीक्षक ४२३ ३८७ ३६
हवालदार १११९ ७४५ ३७४
नाईक -- ६६४ --
शिपाई २८४१ १९७४ ८६७
----------------------------------------------------------------