थेरगावमध्ये गुरुवारपासून ‘व्हेरॉक कप’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थेरगावमध्ये गुरुवारपासून ‘व्हेरॉक कप’
थेरगावमध्ये गुरुवारपासून ‘व्हेरॉक कप’

थेरगावमध्ये गुरुवारपासून ‘व्हेरॉक कप’

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीने १२ वर्षाखालील मुलांच्या ‘व्हेरॉक कप’ हिवाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. गुरुवारपासून (ता. १०) २५ नोव्हेंबरपर्यंत थेरगाव येथे स्पर्धा होणार आहे. यजमान व्हेरॉक वेंगसरकर ॲकॅडमीच्या दोन संघांसह १६ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीच्या थेरगाव येथील मैदानावर गुरुवारी स्पर्धेचे उद्‍घाटन होईल. सर्व सामने त्याच मैदानावर होतील. सुरुवातीला चार गटात साखळी सामने होतील. गुणानुक्रमे आठ अव्वल संघांमध्ये चार उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतील चार विजेत्या संघांमध्ये दोन उपांत्यफेरीचे सामने होतील आणि अंतिम सामना २५ नोव्हेंबर रोजी होईल. त्याचवेळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होईल. प्रत्येक सामना २० षटकांचा असेल. प्रत्येक सामन्यातील सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना, तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमीचे फिटनेस प्रशिक्षक डॉ. विजय पाटील यांनी दिली.

स्पर्धेत सहभागी संघ
स्पर्धेमध्ये व्हेरॉक वेंगसरकर ॲकॅडमीच्या दोन संघांसह ऑल स्टार क्रिकेट ॲकॅडमी, एच. के. बाऊन्स ॲकॅडमी, आर्यन्स क्रिकेट ॲकॅडमी, सहारा क्रिकेट ॲकॅडमी, सेव्हन स्पोर्ट्स ॲकॅडमी, ब्रिलियंटस् क्रिकेट ॲकॅडमी, विरांगण क्रिकेट ॲकॅडमी, नाऊ फिट क्रिकेट ॲकॅडमी, प्राधिकरण जिमखाना, परंडवाल क्रिकेट ॲकॅडमी, स्पोर्ट्स पार्क क्रिकेट ॲकॅडमी, गॅरी कर्स्टन ॲकॅडमी, ट्रिनिटी क्रिकेट ॲकॅडमी व स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमी असे सोळा संघ निमंत्रित आहेत.
---