औद्योगिक क्रीडा संघटनेची आकुर्डीमध्ये कॅरम स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक क्रीडा संघटनेची आकुर्डीमध्ये कॅरम स्पर्धा
औद्योगिक क्रीडा संघटनेची आकुर्डीमध्ये कॅरम स्पर्धा

औद्योगिक क्रीडा संघटनेची आकुर्डीमध्ये कॅरम स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः आकुर्डी येथील बजाज ऑटो वेल्फेअर हॉल येथे औद्योगिक क्रीडा संघटनेची ५९ वी कॅरम स्पर्धा झाली. या कॅरम स्पर्धेसाठी खेळाडूंचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकेरी अंतिम फेरीमध्ये संजय थिटे (टाटा मोटर्स) याने श्रवण तलाठी (सिमंडसं मार्शल) यांच्यावरती २२-६, २०-४ असा विजय मिळवून औद्योगिक क्रीडा संघटनेच्या कॅरम स्पर्धेचे (एकेरी) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. औद्योगिक क्रीडा संघटनेच्या या स्पर्धेचे आयोजन बजाज ऑटो, आकुर्डी व औद्योगिक क्रीडा संघटना यांनी संयुक्तरीत्या केले. या कॅरम स्पर्धेचे पारितोषिक वितरण नरेंद्र कदम, शशिकांत कात्रे (टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटी अध्यक्ष), मंदार कुलकर्णी (उत्कर्ष क्रीडा ॲकॅडमी) व प्रदीप बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रदीप बारटक्के, आशिष इंगवले, मुकेश इंगुळकर व त्यांचे सहकारी यांनी बहुमोल मदत केली. तसेच मंदार कुलकर्णी (उत्कर्ष क्रीडा ॲकॅडमी) यांनी उपांत्य व अंतिम फेरीचे युट्युबवर थेट प्रक्षेपण केले. स्पर्धेच्या सुरवातीला प्रदीप वाघ यांनी प्रास्ताविक केले. आभार सदाशिव गोडसे यांनी मानले.

स्पर्धेचे उपांत्य व अंतिम फेरीचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
एकेरी उपांत्य फेरी १ : संजय थिटे (टाटा मोटर्स) विजयी विरुद्ध मुकेश इंगुळकर (महेंद्र लॉजिस्टिक्स),१५–१४,१७–८.
एकेरी उपांत्य फेरी २: श्रवण तलाठी (सिमंडसं मार्शल) विजयी विरुद्ध मनोज भोसले(टाटा मोटर्स),१३–९,२३–२१.
दुहेरी उपांत्य फेरी १: मनोज भोसले,शशिकांत गायकवाड(टाटा मोटर्स)विजयी विरुद्ध शैलेश ढवळे, प्रीतम कटके (ॲम्युनिशन फॅक्टरी)२३–०,२५-०.
दुहेरी उपांत्य फेरी २ : संजय थिटे, शैलेश शर्मा(टाटा मोटर्स)विजयी विरुद्ध संतोष शिंदे, जनार्दन हजारे(एसकेएफ),२३–७,२५–३.
दुहेरी अंतिम फेरी : शशिकांत गायकवाड व मनोज भोसले या टाटा मोटर्सच्या जोडीनं संजय थिटे, शैलेश शर्मा या टाटा मोटर्सच्या जोडीवर २५–११, असा विजय मिळवून औद्योगिक क्रीडा संघटनांच्या कॅरम स्पर्धेचे (दुहेरी) विजेतेपद मिळविले तर एकेरी अंतिम फेरीमध्ये संजय थिटे(टाटा मोटर्स) याने श्रवण तलाठी (सिमंडसं मार्शल) यांच्यावरती २२-६, २०-४ असा विजय मिळवून औद्योगिक क्रीडा संघटनेच्या कॅरम स्पर्धेचे (एकेरी) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.